faशन paशन…फ्यूजन आवडतं

मृण्मयी देशपांडे

तुझी आवडती फॅशन – लाँग फ्रॉक

फॅशन म्हणजे – स्वतःला कम्फर्टेबल करणं किंवा स्वतः कम्फर्टेबल असणं.

व्यक्तिगत आयुष्यात कशाप्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतेस? सहज, सोपे आणि फार विचार न करायला लावणारे.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? – तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो. फॅशन म्हणजे केवळ कपडे नाही तर तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कसे आहात हेही महत्त्वाचे असते.

आवडती हेअरस्टाईल? – बऱयाचदा केस मोकळे सोडायला आवडतात पण मेसी बन आवडतात.

फॅशन जुनी की नवी? – जुनी.

आवडता रंग? – काळा

तुझ्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते – माझ्या माणसांना मी कुठल्याही कपडय़ात आवडते. स्वप्नीलला कायम वाटते मी साडी नेसावी. एकंदरीत त्याला इंडियन लूकमध्ये मी आवडते.

स्ट्रिट शॉपिंग आवडते का?- शॉपिंग मुळात मला आवडत नाही.  वेळेचा अपव्यय असे मला वाटते. त्यापेक्षा मी ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देते.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता ?- शूज.

ज्वेलरीमध्ये काय आवडते? – काहीच नाही. सिनेमात देखील हलकी ज्वेलरी घालायला आवडते. मला छान कपडे आवडतात, पण ज्वेलरी अजिबात नाही. खूप रेअरली काहीतरी घालते.

आवडता ब्रॅण्ड- खूप आहेत, पण मँगो जरा.

फॅशन फॉलो कशी करता? – मला जे वाटते, जे शोभते ते घालते शिवाय त्याक्षणी जो मूड असतो तसे कपडे घालते. तुम्ही कपडे कॅरी कसे करता आणि ते घालून आत्मविश्वासाने किती वावरता यावर फॅशन अवलंबून असते. फॅशन फॉलो वगैरे मी करत नाही.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? –  माझ्या स्टायलिस्ट मला अपडेट करत असतात.

ब्युटी सिक्रेट – खूप आनंदी आहे. सुंदर कुटुंब, धमाल नवरा आणि धाकटी बहीण मालिकेत येतेय त्यामुळे खूश आहे. त्याचा प्रभाव चेहऱयावर दिसतोय.

टॅटू काढायला आवडेल का? नाही.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी – परफ्युम, लिपस्टिक आणि मला असे वाटते की, कपडय़ांच्या फॅशनबरोबर तुम्ही एका फॅशनचा विचार करता त्यासाठी कागद-पेन मला सतत लागते.

फिटनेससाठी… सूर्यनमस्कार, योगा आणि मेडिटेशन.