काय आहे स्मिता गोंदकरच्या स्टाईलचे सिक्रेट?

2

तुझी आवडती फॅशन – इंडो-वेस्टर्न कपडे घालायला आवडतात.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतेस? – कॅज्युअल्स. त्याचबरोबर जे मला कम्फर्टेबल आणि सुटसुटीत वाटतील.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? – फॅशन म्हणजे तुमचा आत्मविश्वास. केवळ कपडे म्हणजे फॅशन नाही ते तुम्ही कॅरी कसे करता ते महत्वाचे आहे.

आवडती हेअरस्टाईल? – टाईड हेअर

फॅशन जुनी की नवी? – दोघांचा एक वेगळा रुबाब आहे. कारण जुनं ते सोनं असते. मला वेस्टर्न कपडय़ांना पारंपारिक टच असलेले कपडे आवड़तात. त्यामुळे साडी ऑल टाईम फेव्हरेट आहे. त्यात मी सुंदर दिसते आणि माझ्या मते सगळ्याच महिलांना साडी सुंदर दिसते.

आवडता रंग? – मला ब्राईट रंग आवडतात. निळा आणि गुलाबी माझा आवडता रंग.

तुझ्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते – त्यांना मी आहे तशीच आवडते. पण विशेष करुन साडी आणि गाऊनमध्ये जास्त सुंदर दिसते.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का? – हो नक्की

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता? – सनग्लासेस

ज्वेलरीमध्ये काय आवडते? – आधी नाही आवडायचे पण आता सगळे आवडते. पण मला आकर्षक ब्रेसलेट्स आवडतात.

आवडता ब्रॅण्ड – स्टायलिन

फॅशन फॉलो कशी करता? – मी फॅशन फॉलो करत नाही. मला जे आवडते जे शोभते तेच घालते. माझं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आता प्रत्येक सकाळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? – मी कुठलीही फॅशन हंगामाप्रमाणे नाही करत. फॅशनबाबत माझे कुठले नियम नाहीत.  उदाहरणचं  द्यायचे असेल तर हिरवा रंग फॅशनमध्ये असेल तर मला नारंगी रंग वापरायला आवडतो.  त्यामुळे सध्या कुठली फॅशन आहे तीच फॅशन करायला पाहिजे असे काही नाही आहे. मी फॅशनबाबत तेवढी कॉन्सिअस नाही. पण फॅशन विक्स,  मासिके आणि रिचा यांच्यामुळे मी सतत अपडेट असते.

ब्युटी सिक्रेट – भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा.

टॅटू काढायला आवडेल का?- अजिबात नाही.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी – लिप बाम, कोंब क्लिप आणि परफ्युम

फिटनेससाठी…- वर्कआऊट, मेडिटेशन आणि योगा.