faशन-paशन-…रूबाबदार राहायला आवडतं


सई लोकूर

तुझी आवडती फॅशन…जी ट्रेण्डमध्ये आहे ती.

फॅशन म्हणजे…ग्रेस.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतेस?…माझ्यावर जे छान दिसतात, जे कम्फर्टेबल असतात आणि मला शोभून दिसतात असे कपडे आवडतात.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…जिबात नाही. फॅशन म्हणजे केवळ कपडे नाही तर फॅशनमध्ये भरपूर गोष्टी येतात. तुमच्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सर्व काही फॅशनमध्ये येते.

आवडती हेअरस्टाईल? मला मोकळे केस आवडतात. माझ्या मते कुठलीही स्त्री ही सगळ्यात सुंदर मोकळ्या केसांमध्ये दिसते.

फॅशन जुनी की नवी?…नक्कीच नवीन. कारण ती सतत बदलत असते. आता जुने ट्रेण्ड पुन्हा फॅशनमध्ये येत आहेत.

आवडता रंग?…काळा.

तुझ्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते?…मी इंडियन लुकमध्ये सगळ्यांना आवडते.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का? हो, खूप. जंक ज्वेलरीसाठी मी खूप स्ट्रिट शॉपिंग करते आणि ज्या पद्धतीची जंक ज्वेलरी रोडसाईडला मिळते. ती ऑनलाइन किंवा मोठय़ा दुकानांमध्ये नाही मिळत. त्यामध्ये बऱयाच व्हरायटी असतात शिवाय ती स्वस्त असते. त्यामुळे लिंकिंग रोड, कोलाबा कॉजवे येथे शॉपिंग करते.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?…कपडे, चप्पल,घडय़ाळ.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?…इअरिंग्स. सध्या मी ऑक्सिडाइडचे झुमक्यांच्या प्रेमात आहे. इंडो वेस्टर्न दोन्ही लुकवर ते छान दिसतात.

आवडता ब्रॅण्ड…एक असा नाही. कारण मला जे आवडते ते घेते त्यासाठी मला बॅण्ड पाहावा लागत नाही. शिवाय मी ब्रॅण्ड फ्रिक नाही आहे. कधी नॉन ब्रॅण्डेड कपडे आवडले तरी मी ते घेते.

फॅशन फॉलो कशी करतेस?….इंस्टाग्रामवर. बॉलीवूड कलाकारांना पाहून सध्या ट्रेण्डमध्ये काय आहे ते पाहते. बाहेर फिरत असेन तर मुलींनाच चेकआऊट करत असते. त्यांचा पेहराव, कलर कॉम्बिनेशन, हेअरस्टाईल या सगळ्याचे निरीक्षण करत असते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…निरीक्षण करत असते. परदेशी गेले की खूप शॉपिंग करते. मला जे कॊम्फर्टेबल वाटतं ते घालते. मिक्स मॅच कपडे घालायला आवडतात. मी शॉपिंग ऍडिक्ट आहे. नेहमी ट्रेण्डी राहायला आवडतं. कपडे रिपीट करायला आवडत नाही.

ब्युटी सिक्रेट…चांगले खाणे, व्यायाम आणि पुरेशी झोप.

टॅटू काढायला आवडेल का?…हो माझ्या अंगावर माझ्या डॉगीचा टॅटू आहे. त्याच्यासाठी तो मी टॅटू काढलेला आहे. माझ्या मानेवर आहे. मला टॅटू काढायला आवडतात, पण उगाच काढायला आवडत नाही. त्यामागे काहीतरी हेतू असायला हवा.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…लिपस्टिक, मोबाईल फोन, ग्लेअर्स.