faशन paशन…स्ट्रीट शॉपिंग आवडते…


राजेश शृंगारपुरे

आवडती फॅशन…जे कम्फर्टेबल वाटते ती फॅशन.

फॅशन म्हणजे…व्यक्तिमत्त्वाला साजेल असे आणि जे घातल्यावर आत्मविश्वास येतो असे.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…टीशर्ट आणि जीन्स.

फॅशन म्हणजे केवळ कपडे कीनाही. फॅशन म्हणजे व्यक्तिमत्त्व, स्वतःला अपडेट ठेवणे आणि आत्मविश्वास कायम असावा.

आवडती हेअरस्टाइलसाइड पार्टिशन.

फॅशन जुनी की नवी?…जुनी-नवी अशी काही नाही. वेगवेगळ्या ट्रेण्डनुसार फॉलो करायला आवडते. पण अलीकडे जुनी फॅशन नव्याने आलीय. ती एक सायकल आहे. एका पर्वानंतर ती पुन्हा फॅशनमध्ये येते.

आवडता रंगसफेद, निळा.

तुमच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते?…असं काही नाही. त्यांना मी कुठल्याही कपडय़ात आवडतो. कारण ती आपली मांणसे आहेत.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…हो, भरपूर. मी कुठेही करतो. फिक्स असे कुठेच नाही. पूर्वी फॅशन स्ट्रीट, लिंकिंगला जायचो, पण कपडे घेताना जे आवडेल, जे शोभून दिसतील असेच घेतो. जिथे जाईन काही चांगले वाटले तर लगेच घेतो. कारण कपडे कुठलेही घातले तरी ते कॅरी करता आले पाहिजेत.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?…कपडय़ांवरच.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?…घडय़ाळे.

आवडता ब्रॅण्डब्रॅण्ड असा एखादा नाही सांगता येणार, पण जे कपडे आवडतात ते घेतो, मग ते कुठल्याही ब्रॅण्डचे असो. तेव्हा ब्रॅण्ड माझ्यासाठी महत्त्वाचा नसतो.

फॅशन फॉलो कशी करता?…जे मनाला वाटते ते फॉलो करतो. समोरच्याने घातले म्हणून मी तसेच घातले पाहिजे असे काही नाही. त्यावेळेला, त्या क्षणाला जे योग्य असेल तसे कपडे ंमी घालतो.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठीमी काहीच करत नाही. मला योग्य वाटेल असेच कपडे घालतो.

ब्युटी सिक्रेट… भरपूर पाणी पितो, वेळच्यावेळी खातो आणि सगळ्यात महत्त्वाचे कसलेही व्यसन नाही.

टॅटू काढायला आवडेल का?…अजिबात नाही. देवाने इतका सुंदर देह दिला आहे तसेच राहावे. उगाच त्यावर प्रयोग नको. अनैसर्गिक गोष्टी कशाला करा.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी… परफ्युम, ग्लेअर्स, अत्तर.

फिटनेससाठीव्यायाम वीस टक्के आणि एेंशी टक्के आहार घ्यावा. प्रत्येकाची शरीराची रचना वेगवेगळी आहे. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून खावे पण नियंत्रणात खावे. त्यात आवडनिवड नको. जे ताटात येईल ते खा, नखरे नकोत.