FAशन PAशन…फॅशन म्हणजे आत्मविश्वास

श्रुती मराठे

तुझी आवडती फॅशन…कॅज्युअल काहीही आवडतं.

फॅशनची व्याख्या…तुम्ही ज्यात कम्फर्टेबल असता, ती तुमची फॅशन. ट्रेण्ड चालू आहे म्हणून ते करणं चुकीचं आहे.

 व्यक्तीगत आयुष्यात कशाप्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतेस?…इंडियन-वेस्टर्न दोन्ही. म्हणजे जितका मला सलवार कमीजही घालायला आवडतो तितकेच जिन्स आणि टिशर्ट घालायला आवडतं.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…नाही, मला वाटतं फॅशन म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुम्ही घातलेल्या कपडय़ांमध्ये स्वतःला कसे कॅरी करता तेही महत्वाचे असते. कपडे सगळेच घालतात पण त्याबरोबर स्वतःहा कॅरी करणे महत्वाचे असते.

आवडती हेअरस्टाईल?…ओपन हेअर विथ कर्ल्स

फॅशन जुनी की नवी?…नवी. फॅशन ही सतत रिपीट होते. दहा वर्षांची फॅशन पुन्हा येते. बेलबॉटम आले आहेत, स्किनी जिन्स गेल्या आता काहीदिवसाने पुन्हा त्या फॅशनमध्ये येतील. आधी क्रॉप टॉप होते आणि पुन्हा आले. त्यामुळे फॅशन सतत बदलत असते आणि रिपीट होत असते.

 तुझ्या जवळच्यांना तुझी कोणती फॅशन आवडते…अनेकांना मी साडीमध्ये आवडते. बाहेर जायचं असेल तेव्हा मी साडीलाच प्राधान्य देते.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…हो, ठरवून करत नाही. मी शुटिंगनिमित्त कुठेही गेले की तिथल्या लोकल गोष्टी आवर्जून खरेदी करते.

कशावर जास्त खर्च करतेस?…फुटवेअरवर.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?…सोन्याचे दागिने सोडून सर्व दागिने आवडतात.

फॅशन फॉलो कशी करतेस?…मी ट्राय करते. काही वेळा ती फॅशन शोभूनही दिसते. पण हे करत असताना मी माझा बॉडी टाईप लक्षात ठेऊनच करते.

तुझ्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…लिप बाम, घराची किल्ली आणि सनग्लासेस

फिटनेससाठी… बॅलेन्स डाएट, व्यायाम आणि आहार.