Faशन Paशन…आनंदी राहणं हीच फॅशन

31

भाऊ कदम

तुमची आवडती फॅशन – जिन्स आणि टी-शर्ट.

फॅशन म्हणजे – नवीन नवीन प्रकारचे कपडे वापरणे किंवा आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे कपडे घालणे म्हणजे फॅशन.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?- शर्ट-पॅण्ट, शॉर्ट्स टी-शर्ट.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की? नाही कपडय़ांबरोबर तुमची स्टाईल, ऍक्सेसरीजही महत्त्वाचे असतात.

आवडती हेअर स्टाईल? जी आहे तिच आवडते. त्यावर काही प्रयोग करत नाही. काही करता आलं असतं तर ते केले असते.

फॅशन जुनी की नवी? मला जुनी फॅशन फॉलो करायला आवडते आणि नवीन आवडते, पण ती फॉलो करायला आवडत नाही.

आवडता रंग? –पिवळा

तुमच्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते – फॉर्मल कपडय़ांमध्ये आवडतो. विशेष म्हणजे हाफ सदरा, पॅण्ट आवडतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का? – आधी फॅशन स्ट्रीट, दादर टी. टी. इथून खूप करायचो, पण आता नाही करत.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता? – कपडय़ांवर जास्त होतो.

ज्ंवेलरीमध्ये काय आवडते? – कडं

आवडता ब्रॅण्ड- कॉटन किंग

फॅशन फॉलो कशी करता?- माझी बायकोच माझ्यासाठी फॅशन डिझायनर आहे. ती माझ्यासाठी कपडे खरेदी करत असते आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला लावते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी? सोशल साईट्सवर फारसा ऑक्टिव्ह नसतो, अशावेळी माझी बायको, मुली मला अपडेट करत असतात.

ब्युटी सिक्रेट- हसत आणि आनंदी राहणे.

टॅटू काढायला आवडेल का? काढला नाही, काढायचे असे ठरवले होते पण नंतर वेगवेगळ्या भूमिका करताना ते दिसणार. या भितीने काढलाच नाही.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी- पावर बँक, ग्लेअर्स आणि पाकिट.

 फिटनेससाठी… जेव्हा भूक लागेल तेव्हा खातो, सगळं खातो पण प्रमाणात खातो आणि पुरेशी झोप घेतो.

आपली प्रतिक्रिया द्या