फॅशन…मी माझा

223

शिवाजी साटम

फॅशन म्हणजे... जे आवडतं, जे भावतं ती माझ्यासाठी फॅशन.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…साधी पॅण्ट, कॅज्युअल शर्ट

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…फॅशन म्हणजे व्यक्तिमत्त्व. मी, माझा.

आवडती हेअरस्टाईल?...साधी आवडते आणि जी आहे तीच आवडते. शिवाय आजच्या तरुणाईची बाजूला बारीक केस आणि मध्ये उभे केलेले केस अशी आवडते.

फॅशन जुनी की नवी?…माझ्यासाठी जुनी-नवी फॅसन असं काही नाही. जे कपडे घातल्यावर मी कम्फर्टेबल असतो, ज्यात मला वावरायला सोपे जाते, ते कपडे घालण्यास माझे प्राधान्य असते.

आवडता रंग?… पांढरा, निळा

तुमच्या जवळच्या लोकांना तुमची कोणती फॅशन आवडते...मी कुठल्याही समारंभात बुशशर्ट घालण्यास पसंती देतो. अर्थात माझे घरचे काहीवेळा माझी एकच फॅशन पाहून वैतागतात, पण मी समारंभातही शर्ट घालणेच पसंत करतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?… हो. कधी कधी खूप छान कपडे मिळतात. ते बघितल्यावर घ्यावेसे वाटतात.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?… माझा जास्तीतजास्त खर्च शर्ट्स, टीशर्टवर होतो.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?… घडय़ाळं

आवडता ब्रॅण्ड…ब्रॅण्ड वगैरे असे काही नाही. मला जसे आवडतात तसेच कपडे घालतो.

फॅशन कशी फॉलो करता?… फॅशन मी अजिबात फॉलो करत नाही. मला जे आवडतं, जे शोभतं आणि जे भावतं तेच घेतो. आपण जे परिधान करतो तीच फॅशन… असंच माझं मत आहे. फॅशनसाठी मी अजिबात कोणाला फॉलो करत नाही.

टॅटू काढायला आवडतो का?…इतरांच्या हातावर टॅटू पाहून मलाही टॅटू काढण्याची इच्छा होते. पण आता टॅटू काढण्याचे वय उरले नाही असे वाटते.

ब्युटी सिक्रेट...आनंदी राहणे. सतत हसत राहणे आणि सकारात्मक विचार.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी… परफ्युम, ग्लेअर्स आणि टीशर्ट

फिटनेससाठी…नियमित चालायला जाणे आणि घरचे जेवण.

आपली प्रतिक्रिया द्या