Fa शन Pa शन

विद्याधर जोशी

वातावरणाला साजेसे कपडे आवडतात

तुमची आवडती फॅशन…जिन्स आणि टी-शर्ट

फॅशन म्हणजे…आपल्याला जे शोभेल आणि वातावरणाला साजेसे कपडे म्हणजे माझ्या दृष्टीने फॅशन.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…जिन्स, टी-शर्ट घालायला आवडतं.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…नाही, आपली जीवनदृष्टी.

आवडती हेअरस्टाईल?…आता जे शिल्लक केस आहेत ते छान दिसतील अशी.

फॅशन जुनी की नवी?…मला दोन्ही आवडतात. पारंपरिक आणि ट्रेण्डी कपडे घालायला आवडतात.

आवडता रंग?…पांढरा, हिरवा

तुमच्या जवळच्यांना तुमची कोणती फॅशन आवडते… माझ्या बायकोला नीट आणि छान कपडय़ात आवडतो. तसा मी फार कमी वेळा राहतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…हो. ठरवून स्ट्रीट शॉपिंग करत नाही. कुठेतरी शूटिंगला किंवा दौऱयावर असताना काही आवडले तर नक्की खरेदी करतो.

zकोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?…कपडय़ांवर.

ज्वेलरीमध्ये काय आवडते?…ब्रेसलेट, चैन

आवडता ब्रॅण्ड …एखादा असा नाही बरेच आहेत. पण जिन्समध्ये लिवाईस ब्रॅण्ड आवडतो.

फॅशन फॉलो कशी करता?…असं काही फार बघून करत नाही. पण मुख्यतः आजूबाजूला जे काही चालले आहे त्यातले मला चांगले वाटेल, शोभेल असे.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…फार काही करत नाही. मासिकांवरचे मॉडेल्सचे कपडे, आजूबाजूला मित्रमंडळी जे वापरतात ते पाहतो.

ब्युटी सिक्रेट…नॅचरल राहणे.

टॅटू काढायला आवडतो का?…अजिबात नाही.

 तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…ग्लेअर्स, डिओड्रण्ट, शेव्हिंग किट.

फिटनेससाठीजमेल तेव्हा मनापासून व्यायाम करतो. आठवडय़ातून दोन-तीनदा करतो.