फॅशनेबल कॅपसह करा हिवाळ्याचे स्वागत

सामना ऑनलाईन । मुंबई

थंडीत टोपी, मफलर, स्वेटर यांची गरज सर्वांनाच भासते. पण आता सर्व काही नवीन फॅशनेबल रूपात बाजारात आले आहे. आपल्याकडे थंडीला हवी तशी सुरुवात झाली नसली तरी हिवाळ्याचा सामना करायचा असेल तर संरक्षणासोबत स्टाईलही हवीच ना… कॅपचाही कायपालट झाला असून त्यात विविध प्रकार बाजारात पाहायला मिळत आहे.

cap-1

टरबन कॅप
टरबन कॅप दिसायला जितकी वेगळी तितकीच ती आरामदायी व स्टायलीशही आहे. टरबन कॅपच्या पुढील बाजूस एक नाडी असते त्यामुळे ही कॅप दिसायला अधिकच चांगली दिसते. त्याशिवाय यात विविध डिझाईन उपलब्ध असल्यामुळे अनेक मॉडल्सही त्याचा वापर करतात.

cap2

बीनी कॅप
ही कॅप डोक्यापासून कानापर्यंत असल्याने थंडीत हिचा पुरेपुर वापर तुम्ही या हिवाळ्यात नक्कीच करू शकता. सध्या ही कॅप बरीच चर्चेत असून यात विविध डिझाईन व रंगही उपलब्ध आहेत.

cap3

मंकी कॅप
मंकी कॅप ही लहान मुलांसह सगळ्यांनाच चांगली दिसते. मंकी कॅप हिवाळ्यातील थंड हवेपासून बचाव करते. ही कॅप जिन्सवर चांगला लुक देत असून विविध रंगात ती उपलब्ध आहे.

cap4

फर कॅप
फर कॅप ही सहज उपलब्ध असणारी कॅप असून त्याला महिला वर्गाची चांगली पसंती आहे. जुनीच फॅशन नवीन हटके रूपात आल्याने तिचा वापर अनेक सिनेकलाकारही करताना दिसतात. ही कॅप विविध रंग व डिझाईनमध्ये उपलब्ध आहे.

cap-5

प्रिंसेस कॅप
या कॅपवर बार्बी, डोरा, सिंड्रेला यांसारख्या कार्टुन्स चित्रे असल्याने ही कॅप लहान मुलींमध्ये फार प्रसिद्ध आहे. यात गुलाबी, निळा यांसारखे रंगाची जास्त चलती आहे.

cap-6

मफलर कॅप
मफलर कॅप ही थंडीसाठी उपयुक्त असून त्यात कॅपसह मफलरही मिळते. त्यामुळे या हिवाळ्यात थंडीच्या बचावासह तुम्हाला मॉर्डन लुकही मिळू शकतो.