फॅशनेबल रात्र! झोपताना परिधान करण्याचे सुंदर, आकर्षक पेहराव

प्रणोती म्हात्रे, फॅशन डिझायनर

फॅशनेबल रात्र….दिवसा लोकांसमोर वावरताना आपल्याला फॅशनेबल , सुंदर राहावेच लागते. दिसावेच लागते. पण मग रात्र…रात्री सुद्धा सुंदर फॅशनेबल होण्याची संधी बदललेल्या काळानुरुप, बदललेल्या झोपण्याच्या पोशाखांनी दिली आहे. आज अनेक देखणे नाजूक नाईट ड्रेसेस फॅशन जगतातून आणले जातात. आपले सौंदर्य हे आपल्यासाठी असते. आपण जेवढे सुंदर दिसू तितक मनही सकारात्मक आणि प्रसन्न राहते.

काळ बदलला आहे त्यामुळे तरुणींच्या पेहरावातही बदल झाला आहे. दिवसाबरोबर रात्रीचे कपडेही फॅन्सी असायला हवे याकडेच तरुणींचा कल आहे. त्यामुळे अलीकडे वेगवेगळ्या प्रकारचे नाईट ड्रेसेस फॅशनमध्ये दिसायला लागले आहे. अगदी हव्या त्या रंगात आणि हव्या त्या डिझाईनमध्ये हे ड्रेसेस पाहायला मिळत आहेत.  नाईट वेअर म्हटलं की नुसत फॅशन नाही. तर त्याबरोबर तुमचं फॅब्रिक तितकेच महत्त्वाचे असते. नाईट वेअर्सची क्रेझ तरुणींमध्ये दिसायला लागली आहे. स्टायलिस्ट नाईट वेअर म्हणजे चांगल्या कपडय़ाबरोबर फॅन्सी प्रिंट्स आणि रंग तेवढेच महत्त्वाचे असतात. रोजच्या वापरासाठी कॉटन, रेयॉन कॉटन असे कपडे वापरावेत ते कपडे कुठेही टोचत नाही. त्यानंतर या कपडय़ांचे रंगही निघत नाहीत. नाईट वेअर निवडतानाही थोडे चौकस असायला हवे. कारण तुमच्या घरी कोणी येत नसेल तर हवे तसे नाईट ड्रेस घालू शकता. पण तुमच्या घरी लोकांचा वावर असेल तर ऑकवर्ड वाटायला नको हेही लक्षात घ्यायला हवे. अशा वेळेला प्रिंटेड आणि प्लेन या दोन्ही प्रकारचा वापर करून त्यावर छोटय़ा छोटय़ा फ्रिल देतो. अर्थात त्या त्या वयानुसार. त्याच्यानंतर त्यावर थोडी रेशमी ऍम्ब्रॉडरी करतो. थंडीच्या दिवसात सॅटिनचे कपडे वापरताना जास्त दिसतात. तर काहींना सॅटिनचे नाईट वेअर आवडतात ते चुरत नाही. यामध्ये कार्फ लेन पॅटर्न, मिडी म्हणजे नाईट ड्रेस त्याला थोडा बेल शेप दिला की तो स्लिवलेस प्रिफर करतात. काहीजणी बिलो नी घालतात.

सध्याचे नाईट वेअर

सध्या कफ्तान या रेयॉन कॉटन बाटीकचा ट्रेण्ड आहे. फॅन्सी आणि आरामदायी असल्याने याची मागणी जास्त आहे. लोकांची पसंती आहे. तसेच दुसरी अम्ब्रेला पॅटर्न असते वेस्ट लेन परंतु योक असतो. याबरोबरच बरमोडा शॉर्ट विथ टॉप, कॉटन टॉप आणि त्याखाली शॉर्ट या प्रकारचे कपडे आज अनेक तरुणी घालणे पसंत करतात. वन पिस गाऊन हे पण छान ऑप्शन आहे. हे सैलसर कपडे आहेतच पण फॅशनही आहे. याबरोबर सॅटिन लेस आणि फ्लोरल प्रिंट्स वाले ड्रेसची चलती आहे.