फॅशनेबल गॉगल्स

सामना ऑनलाईन । मराठी

थंडीबरोबर सूर्यकिरणेही सुखावताहेत. पण या किरणांमधील क्ष किरणे डोळ्यांसाठी हानीकारकच असतात. त्यामुळे हे दिवस मस्त फॅशनेबल गॉगल्सचेही आहेत.

– चष्मा किंवा गॉगल हा फॅशन म्हणून वापरण्याचा दागिना नाही, तर यामुळे डोळ्यांचे हानिकारक युवी किरणांपासून संरक्षण होण्यासाठी सनग्लासेस वापराव्यात.

– चष्मा विकत घेताना त्याच्या फ्रेमचा आकार चेहऱ्याला शोभेल असाच विकत घ्या. चुकीच्या फ्रेमचा वापर केला तर ती कधीही पडू शकते किंवा त्याचे त्वचेवर त्याची खूण राहते.

– फ्रेम मेटल, नायलॉन, प्लास्टिक आणि टायटेनियम यापैकी कोणत्या वस्तूपासून बनवली आहे याची चौकशी करा. प्रत्येक फ्रेमचे काही फायदे आणि तोटे आहेत. ज्या फ्रेमचे फायदे जास्त असाच चष्मा विकत घ्या.

– व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी गॉगल महत्त्वाचेच… पण त्यातही टिंटेड सनग्लासेसचा वापर करा. यामुळे युवी किरणांपासून रक्षण होईल. दुकानात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या टिंटेड ग्लासेस आवडीनुसार खरेदी करा.