तारिक फतेहचा गळा चिरा ! इमामाचा फतवा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

कोलकाता शहरामधील टीपू सुलतान मशिदीचे शाही इमाम सय्यद मोहम्मद नूर रहमान बरकती यांनी पाकिस्तानी वंशाचे कनडीयन लेखक तारिक फतेह यांचा गळा चिरा असा फतवा काढला आहे.

बरकती यांनी रविवारी नोटबंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. इमाम यांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. याचपार्श्वभूमीवर सोमवारी एका वृत्त वाहिनीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. यात बरकती व फतेह यांनी सहभाग घेतला होता.

चर्चासत्रादरम्यान बरकती यांनी नोटबंदीवरुन पुन्हा मोदींवर टीका केली. नोटबंदीच्या नावाखाली मोदींनी सामान्यांचे आयुष्यच उध्वस्त केल्याचा आरोप बरकती यांनी यावेळी केला. यावर फतेह यांनी आक्षेप घेतल्याने संतप्त झालेल्या बरकती यांनी तुमचाही गळा चिरला जाईल, असा फतवाच भर कार्य़क्रमात जाहीर केला आहे.