दोन मुलांना ठार मारुन वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

सामना ऑनलाईन । पुणे

पोटच्या दोन मुलांचा खून करून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताथवडे येथे घडली आहे. शनिवारी नृसिह कॉलनीत दुपारी दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

शुभम दिपक बरमन (वय 10)  आणि रुपम दिपक बरमन (वय 8) असे मृत पावलेल्या मुलांचे नाव आहे आहे, तर वडिलांचे नाव दिपक बरमल (वय 35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शनिवारी दुपारी दिपक आणि त्यांचे मुले शुभम, रुपम असे तिघेच घरी होते. दिपक यांनी अगोदर मुलांना मारले. त्यानंतर त्यांनी गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखले केले. परंतु,  उपाचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान,  दोन्ही मुलांच्या गळ्यावर खुणा आढळल्याने गळा आवळून मुलांना मारल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.  या कृत्यामागील कारण अद्याप कळालेले नाही.