पाकिस्तानात ‘सैराट-2’, प्रियकर-प्रेयसीचे वडिलांनी मुंडके उडवले


सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

हिंदुस्थानातील तेलंगाना राज्यामधील नालगोंडे येथे गेल्या आठवड्यात गर्भवती पत्नीसमोर पतीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता पाकिस्तानमधील एट्टोग जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका प्रियकर आणि प्रेयसीचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ‘डॉन’ या वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या वृत्तानुसार, पाकिस्तानातील एट्टाक जिल्ह्यातील एका गावात 21 वर्षाचा प्रियकर आपल्या 18 वर्षीय प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. तरुण घरी आल्यानंतर मुलीचे वडील मसूद आणि तिचा काका वहीद या ठिकाणी आले व त्यांनी दोघांना पकडून दोरीने बांधून ठेवले. यानंतर संतापाच्या भरात नाती विसरलेल्या या नराधमांनी दोघांचे मुंडके धडापासून वेगळे केले. पोलिसांनी हा ऑनल किलिंगचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे.

ऑनर किलिंग कायद्यानंतरही हत्या सुरूच
पाकिस्तामध्ये गेल्या वर्षी ऑनर किलिंग रोखण्यासाठी कायदा करण्यात आला. परंतु हा प्रकार रोखण्यात यश आलेले नाही. ऑनर किलिंगचे शिकार सर्वात जास्त महिलाच होतात. ऑ़क्टोबर 2016 पासून ते जूनपर्यंत पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगच्या 280 घटना समोर आल्या आहेत.