खोट्या प्रतिष्ठेसाठी वडिलांनीच केली मुलीची हत्या

सामना ऑनलाईन । चंदीगड

स्वत:च्या १७ वर्षीय मुलीची शॉक देऊन हत्या केल्याची भयंकर घटना हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यात घडली आहे. दुसऱ्या जातीतील मुलाशी पळून जाऊन लग्न केल्याने मुलीचे वडील आणि काकाने हे लज्जास्पद पाऊल उचललं आहे. पोलिसांनी आरोपी सुरेश कुमार आणि श्याम पंडितला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील आणि काकावर मुलीला विजेचा शॉक देऊन मारल्याचा आणि मृतदेह जाळल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील कांधला जिल्ह्यात ही मुलगी आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. मुलीच्या कुटुंबाने याबाबत कुठलीही तक्रार पोलिसात केली नाही. मात्र काही दिवसांनी त्यांनी मुलीला पुन्हा घरी बोलावून घेतलं आणि कट रचून तिची हत्या केली. सुरेश आणि श्याम यांनी रागाच्या भरात मुलीला विजेचा शॉक दिला. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.