मरण्याच्या भीतीपोटी बाटलीबंद पाण्याची विक्री वाढली- रिसर्च

सामना ऑनलाईन । टोरंटो

बाटलीबंद पाण्याची विक्री सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या विविध कंपन्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. कारण बाटलीबंद पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. मनुष्याच्या मरण्याच्या भीतीपोटी या बाटली बंद पाण्याच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.

बाटली बंद पाणी प्यायल्यानं काही विशेष फायदा होत नाही. मात्र केवळ मरण्याच्या भीतीमुळे लोक हे बाटलीबंद पाणी पित आहेत. बाटलीबंद पाण्याच्या मनुष्याने केलेल्या प्रचारामुळेच बाटली बंद पाणी खरेदी करुन पिण्यासाठी हे पाणी वापरलं जाण्याची सवय माणसांना होत आहे, असं एक संशोधनातून समोर आलं आहे. कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलूचे संशोधक स्टीफन कोट यांनी सांगितलं की, बाटली बंद पाण्याचे प्रचारक माणसांना भीती वाटेल अशा पद्धतीने त्याचा प्रचार करतात. काही लोकांना बाटली बंद पाणी सुरक्षित आणि शुद्ध वाटतं. त्यामुळे मरण्याच्या भीतीने ते बाटली बंद पितात. या संशोधनासाठी सोशल साइकोलॉजी टेरर मॅनेजमेंट थियरीचा वापर करण्यात आला होता.