शिक्षिकेची विद्यार्थ्याला फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण

सामना ऑनलाईन । कानपूर

उत्तरप्रदेशमधील कानपूरच्या एका शाळेत घडलेल्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वर्गामध्ये मित्रांशी गप्पा मारत असल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला डस्टरने मारले आहे. डस्टरच्या जोरदार मारामुळे मुलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. जखमी मुलाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वर्गामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याने हा प्रकार उघड झाला आहे.

मारहाणीची ही घटना कानपूरमधील स्टेपिंग स्टोन शाळेतील असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये वर्गशिक्षिकेसमोर एक मुलगा उभा असल्याचे दिसत आहे. त्यांच्यात काहीतरी बोलणे होते आणि अचानक शिक्षिका मुलाला डस्टरने मारताना दिसते. मुलगा जसा-जसा मागे जातो तशी शिक्षिकाही त्याच्या मागे येऊन त्याला मारहाण करताना दिसते.