राहुरीत बोराला दुप्पट भाव

सामना प्रतिनिधी । राहुरी

मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे बोरांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ६ ते ७ रुपये किलो दर मिळालेल्या चमेली बोराला आज १३ ते १४ रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या महिन्यापासून राहुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, कुर्डुवाडी, भुताष्टे या भागातून चमेली, उमराण बोरांची आवक सुरू आहे. पंधरवड्यापूर्वी चमेली बोराला २ ते ३ रुपये किलो भाव मिळत होता. आता चमेली बोराचा भाव १३ ते १४ रुपये, उमराण बोर ६ ते ९ रुपये, कडाका बोर २० ते २५ रुपये व अ‍ॅपल बोराचा भाव १५ ते २० रुपये झाला आहे. अ‍ॅपल बोराचा भाव १० ते १२ रुपये किलो, तर छोट्या व्यावसायिकांकडून २० रुपये दराने किरकोळ विक्री सुरू आहे. आज चमेली बोराची ८ टन आवक होऊन त्यांना १३ ते १४ रुपये किलोचा भाव मिळाला.