सौदीकडून इजीप्तचे ‘पॅकअप’, यजमान रशियाही पराभूत

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशिया सुरू असलेल्या २१ व्या फिफा विश्वचषकातील साखळी सामन्यामध्ये सौदी अरेबियाने इजीप्तचा २-१ असा पराभव करत त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणले. तर दुसरीकडे उरुग्वेने रशियाला ३-० ने पराभूत करत स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत अंतिम १६ मध्ये झोकात प्रवेश केला.

सोमवारी सायंकाळी दोन सामने खेळवण्यात आले. पहिल्या सामन्यात सौदी अरेबिया आणि इजीप्तची टक्कर झाली. या सामन्यात सौदी अरेबियाने इजीप्तवर वर्चस्व गाजवले. इजीप्तचा स्टार खेळाडू मोहम्मद सलाहने २२ व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० आघाडी मिळवून दिली. परंती मध्यांतरापूर्वी इंज्यूरी टाईममध्ये सौदीच्या सलमान अल-फराजने गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर सामन्याचे निर्धारीत ९० मिनिटं दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. परंतु इंज्यूरी टाईममध्ये सौदीच्या सालेम अल-डॉसरीने गोल करत सौदीला विजय मिळवून दिला.

यजमानांचा पराभव
पहिल्या दोन सामन्यात धमाकेदार विजय मिळवणाऱ्या रशियाला उरुग्वेने पराभूत केले आणि अंतिम १६ मध्ये स्थान मिळवले. उरुग्वेकडून पहिला गोल स्टार खेळाडू लुईस सुआरेजने १०व्या मिनिटाला केला. त्यानंतर २३व्या मिनिटाला डेनीसने गोल करत ही आघाडी डबल केली. सामना संपण्यासाठी एका काही सेकंदाचा अवघी असताना एडीन्सने गोल करत संघाला ३-० असा विजय मिळवून दिला.