बेल्झियमची विजयाने सुरुवात, पनामाचा पराभव


सामना ऑनलाईन । मॉस्को

रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाची रंगत हळुहळू वाढत असून सोमवारी झालेल्या ग गटातील दुसऱ्या सामन्यात बेल्झियमने पनामाचा पराभव करत विजयाने सुरुवात केली. बेल्झियमने एकतर्फी झालेल्या सामन्यात पनामाचा ३-० अशा गोल फरकाने पराभव केला.

फिफा २०१८ : स्विडनकडून दक्षिण कोरियाचा पराभव

पहिल्या हाफमध्ये एकही गोल न झालेला सामना दुसऱ्या हाफमध्ये चांगलाच रंगला. दुसऱ्या हाफमध्ये बेल्झियमच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला आणि पनामावर दबाव टाकला. याचा फायदा घेत ड्रायस मर्टेसने ४७ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जबरदस्त फॉर्मात असलेल्या लुकाकूने ६९ व्या आणि ७५ व्या मिनिटाला गोल करत पनामावर वर्चस्व गाजवले व बेल्झियमला ३-० असा विजय मिळवून दिला.