‘कट’ मारल्याच्या रागातून तुफान हाणामारी; 12 गाड्या फोडल्या, 8 जखमी

1

सामना ऑनलाईन । पालघर

मोटारसायकलने कट मारल्याच्या रागातून डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत 8 जण जखमी झाले असून 12 मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच 5 ते 6 घरांचेही ही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वाणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी जवळपास 42 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.