अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

अल्पवयीन मुलीचं लग्न लावून दिल्या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह इतर काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील एका १६ वर्षाच्या मुलीचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. या बाबत कर्जत येथील जिल्हा व बाल संरक्षक कक्ष अधिकारी यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर उरण पोलिसांनी मनिष म्हात्रे (वडील), आशा म्हात्रे (आई) व त्यांना मदत करणाऱ्या इतर लोकांविरोधात बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी यांनी दिली.