सिने अभ्यासक विजया मुळे यांचे वृद्धापकाळाने निधन

133

सामना प्रतिनिधी । मुंबई

सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आणि फिल्म इतिहासकार विजया मुळे यांचे रविवारी 4 वाजून 45 मिनिटांनी निधन झाले. त्या 98 वर्षांच्या होत्या. ‘अक्का’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विजया मुळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे त्यांच्या कन्या अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी सांगितले. त्यांना काहीच आजार नसला तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांचे जेवण कमी झाले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेविश्वाचा थोर अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्या 4 दिवस होत्या. पण आपल्याला व्हेंटीलेटरवर जास्त दिवस ठेवू नका असे त्यांनी सांगितल्यामुळे त्यांना घरी आणले गेले. पण 19 मे रोजी विजया मुळे यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनेक लघुपटांची निर्मिती

विजया मुळे यांचा जन्म 16 मे 1921 रोजी झाला होता. त्यांनी 1959 साली दिल्ली फिल्म सोसायटीची स्थापना केली होती. त्यानंतर फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीच्या त्या संयुक्त सचिव होत्या. त्यांच्या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी पटणा फिल्म सोसायटीचीही स्थापना केली होती. मुंबई सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या