शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता शाहरुख खान याला ‘रईस’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केलेला रेल्वे प्रवास चांगलाच महागात पडणार आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्यावेळी कोटा रेल्वे स्थानकातील मालमत्तेचे झालेले नुकसान केल्याप्रकरणी शाहरुख खान वर गुन्हा दाखल करण्यात आला आहेकोटा रेल्वे स्थानकातील विक्रेता विक्रम सिंग यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘शाहरुख कोटा स्थानकावर ट्रेन थांबली असता दरवाज्यावर आला. त्यावेळी त्याने चाहत्यांच्या दिशेने एक वस्तू फेकली. ती वस्तू पकडण्यासाठी चाहत्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी खूप धक्काबूक्की झाली. या धक्काबुक्कीत माझ्या सामानाची ट्रॉली पालथी झाली व सर्व सामान खाली पडले. खाली पडलेल्या सामान गर्दीने तुडवल्यामुळे एकही वस्तू वापरण्याजोगी उरली नाही.’ असे सिंग यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

शाहरुख खाने याने २३ जानेवारीला रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई ते दिल्ली असा रेल्वेने प्रवास केला. त्यामुळे शाहरुखला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या स्थानकांवर गर्दी केली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका चाहत्याचा मृत्यूही झाला होता.