मृतदेहाची अवहेलना केल्‍याप्रकरणी पाच जणांवर गुन्‍हा दाखल

95
file photo

सामना प्रतिनिधी । कोपरगाग

हुंडांबळी प्रकरणात सासरच्‍या लोकांवर आरोप होऊन त्‍यांच्‍या अटकेसाठी प्रेताला वेठीस धरून पोलीसांवरी दबाव आणण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. मात्र जमलेला  जमावाच्‍या तीव्र भावना, रोष संताप यात सर्वसाधारणपणे पोलीस दोषी असल्‍याच्‍या अर्विभावात आरोप केले जातात. मात्र दुःखद प्रसंगाचे भान ठेवून पोलीस सर्व सहन करून सामंजस्‍य राखतात मात्र अनेकवेळा पोलीसांच्‍या कामात व्‍यत्‍यय येऊन त्‍यांना मोठा मनस्‍ताप होते. अशीच घटना खोपडी येथील आरती या विवाहितेच्‍या प्रकरणात घडली. अखेर पाणी डोक्‍यावरून गेल्‍याने कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी प्रेताला वेठीस धरून प्रेताची अवहेलना केल्‍याप्रकरणी मृत आरतीच्‍या माहेरच्‍या पाचजणांवर गुन्‍हा दाखल केला. कोपरगाव तालुक्‍याच्‍या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. एकाचवेळी सासर व माहेरकडील १० जणांवर गुन्‍हे दाखल झाल्‍याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

कोपरगांव तालुक्यातील खोपडी येथील  विवाहिता आरती शामहरी त्रिभुवन हिला हुंडयासाठी सासरकडील मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, दोन दीर, सासरा व सासू या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणात मृताच्‍या माहेरच्‍यांनी शवविच्‍छेदनप्रसंगी ग्रामीण रूग्‍णालयात ठिय्या केला. त्‍यानंतर आरतीचे शव खोपडी येथे नेल्‍यांनतरही ‘आरोपींना अटक करा अन्यथा मृतदेहावर अंत्‍यसंस्‍कार करणार नाही’ असा पवित्रा घेत पोलिसांवर दबाब आणण्याचा प्रयत्‍न आरतीच्‍या माहेरच्‍यांनी केला.

आरतीचे प्रेत तीन ते चार तास ओट्यावर तसेच ठेवून प्रेताची अवहेलना केली.  बराच वेळ समजावूनही ऐकत नाही पोलीसांच्या कामात व्‍यत्‍यय येतो, हे पाहुन अखेर  मृत आरतीचा चुलता सुभाष उत्तम पठारे, मावस भाऊ  गणेश बाळु साळवे, चुलत मामा भाऊसाहेब दत्तू आहेर,मामा सुरेश आनंदा लोंढे मेव्हणा सचिन वसंत रणधिर या पाच जणाविरूध्द पो. कॉ. विजय अर्जुन पाटील यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीसांत फिर्यादी दिली. सदर फिर्यादीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या