अंधेरीत मधू इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये आग, १ जवान जखमी

1

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील अंधेरी येथील मधू इंडस्ट्रीअल इस्टेट येथे मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आणि 4 टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मधू इंडस्ट्रीअल इस्टेट येथील गॅलॅक्सी फार्मा कंपनीच्या इमारतीमधील मेडिकल स्टोअरला आग लागली. ती औषधांची कंपनी आहे. या कंपनीत लाकूडाचे फर्निचर आहे आणि कंपनीच्या इमारतीला काचेचं वेष्टन आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. तसेच धूर जास्त झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा निर्माण झाला. यावेळी एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर कूपरमध्ये उपचार सुरू आहेत.

आगीच्या घटनांचे प्रमाण सध्या वाढत असून गेल्या महिन्यातच मुंबईतील परळ भागातील क्रिस्टल टॉवरला आग लागली होती. ज्यामध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.