डोंबिवलीत वीरा शॉपिंग सेंटर इमारतीला आग

सामना ऑनलाईन । डोंबिवली

डोंबिवली पूर्वेला स्टेशन परिसरात टिळक टॉकीजजवळच असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरच्या इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका घरातून आगीला सुरुवात झाली. आग पसरल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

घरातील एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक लगेच घटनस्थळी आले. मात्र रस्त्यावरील वर्दळीतून वाट काढून प्रत्यक्षात आग विझवण्याची कारवाई सुरू करण्यात थोडा वेळ गेला. या कालावधीत आग आणखी पसरली असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.