संभाजीनगरमध्ये माणिक रुग्णालयाला आग, रुग्ण होरपळले

40

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

संभाजीनगरमधील गारखेडा भागातील माणिक रुग्णालयाला सोमवारी सकाळी ११च्या सुमारास आग लागली. तळमजल्याचे काम सुरू असताना अचानक ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीमध्ये काही रुग्ण होरपळले असून त्यांना अन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर इतर रुग्णांना वाचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

माणिक रुग्णालयात तळमजल्यावर काही दुरुस्ती काम सुरू होते. त्यावेळी अचानक आग लागली आणि जनरल वॉर्डपर्यंत पोहोचली. आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आले आहे. तसेच मदत कार्य देखील सुरू आहे. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या