शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत आठ लाख रुपयांचे नुकसान

सामना प्रतिनिधी। घनसावंगी

जालनातील घनसावंगी येथील जुने बसस्थानक परिसरात पहाटे लागलेल्या आगीत तीन दुकान जळून खाक झाली आहेत.शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. आगीत आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जुने बसस्थानक परिसरात शेख रहीमोद्दीन शेख इमरोदिन यांचे अमन इलेक्ट्रॉनिक दुकान जळून खाक झाले असून त्यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या बाजूला लागून असलेल्या भाऊसाहेब रावसाहेब गोरे दुकानातील कपडे शिवनकामाचे चार शिलाई मशीन व इतर साहित्य जळून अंदाजे साडे तीन लाख रुपये किमतीचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तसेच त्यांच्या दुकानाला लागून असलेले दुकान सुभाष नाथराव खैरे यांच्या दुकानापर्यंत ही आग पसरल्याने त्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे साहित्य जळून कोळसा झाले आहे. याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.