फटाक्यामुळे तीन तासात 16 ठिकाणी अागीच्या घटना

1

सामना ऑनलाईन,पुणे

पुणे शहरामध्ये फटाक्यांमुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी राञी  7  ते  10  या तीन तासाच्या कालावधीत विविध    16  ठिकाणी आगीच्या घटना  घडल्य.या आगीमधे सुदैवाने कोणतीही  जिवितहानी झाली नाही. लक्ष्मीपूजनच्या दिवशी शहरात राञी  7  ते  10 या कालीवधीत मोठ्या प्रमाणात फटाके वाजविण्यात आले. फटाक्यामुऴे गुरवार पेठ, रास्ता पेठ, सदाशिव पेठ, कर्वे पुतळा, बावधान, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, सिंध कॉलनी, वानवडी, उंड्री, विमाननगर, खराडी येथे झाड, घर, गाडी, गवताला अशा आगी लागल्या होत्या.  या आगीमध्ये  कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अग्निशामकदलाच्या जवानानी तत्परता दाखवत  सवॆ ठिकाणच्या आगी विझविल्या.