बोईसरमध्ये फर्निचरच्या दुकानांना आग, मालमत्तेचे मोठे नुकसान

61
fire-boisar-shops

सामना प्रतिनिधी । बोईसर

बोईसरमधील चिल्हारच्या रस्त्यावर एकमेकांना जोडून असलेल्या फर्निचरच्या दुकानांना आज पहाटे अचानक आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती आगीत आजूबाजूची दुकाने जळून खाक झाली. लाकडी फर्निचरची दुकाने असल्याने आग काही वेळातच पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या