जळगावात भीषण आग, ८ संसार आगीच्या भक्ष्यस्थानी

सामना प्रतिनिधी । जळगाव

शहरातील तुकारामवाडी परिसरात असलेल्या जानकीनगरमध्ये गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत ८ घरे खाक झाली. दरम्यान, एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.

जानकीनगर परिसरात लाकडी पार्टिशन आणि पत्रे असलेली घरे आहेत. गुरुवारी दुपारच्या वेळी अचानक एका घराला आग लागली. काही वेळातच एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील तरुणांनी धाव घेत मिळेल तिथून पाणी आणून आग विझविण्यास सुरुवात केली.

घटनेची माहिती मिळताच आ. सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, माजी महापौर विष्णू भंगाळे, सुनील महाजन आदी घटनास्थळी पोहचले आहेत.