आगीत ३५० एकर परिसर भस्मसात

सामना प्रतिनिधी । दोडामार्ग

बांदा डिंगणे (धनगरवाडी) येथे एका बागेला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची भीषणता एवढी होती की, थोड्याच अवधीत ३५० एकर परिसरात आग लागली. या आगीत ४५ मेंढया जळुन खाक झाल्या. धनगरवाड्यातील बाळू शिंदे, कृष्णा शिंदे यांच्या मालकीची ही बाग आहे.

काजू, आंबा,बांबू,सागवानची झाडे या आगीत भस्मसात झाली. डिंगणे येथील सावंत कुटुंबियाची बागबागायतीचे सुमारे एक कोटी रुपयांची हानी झाली आहे. आग विझवण्याच्या शर्तीचे प्रयत्न सुरु असुन आग आटोक्यात आली आहे.