पंजाबमधील भंटिडा येथे मतदान केंद्रावर गोळीबार

9

सामना ऑनलाईन । भटिंडा

पंजाबमधील भटिंडा येथे मतदान सुरू असताना दोन गटात हाणामारी झाली असून त्यातील एकाने मतदान केंद्राबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या हिंसाचारात एक जण जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

भटिंडा हा पंजाबमधील प्रतिष्ठेचा मानला जाणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री हरसितकौर बादल या निवडणूक लढवत आहेत. दरम्यान भटिंडा तालवांडी सोबो येथील 122 क्रमांकचा मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत केंद्रावरील खुर्च्या टेबलं देखील तोडण्यात आली. त्याचवेळी एका व्यक्तीने गोळीबार देखील केला. त्यानंतर मतदानकेंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर काही काळ मतदानाची प्रक्रीया थांबविण्यात आली होती. मात्र काही वेळाने मतदानाला पुन्हा सुरुवात करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या