कल्याणमध्ये बिल्डरवर गोळीबार

72

सामना ऑनलाईन । कल्याण

 

ठाणे शहरानजिकच्या कल्याणमधील शीळई कटई नाक्याजवळ विकी शर्मा नावाच्या बिल्डरवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी बुधवारी दुपारी गोळ्या झाडल्या. गोळीबार करुन मारेकरी पळून गेले. जखमी झालेल्या शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस गोळीबार प्रकरणी तपास करत आहेत. गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला की खंडणीसाठी झाला याचाही तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या