उद्या पहाटे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वर्षातील पहिलं चंद्रग्रहण शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता दिसणार आहे. ही खगोलीय घटना पाहण्यासाठी शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांची तयारी सुरू झाली आहे. तसेच हे ग्रहण खंडग्रास असल्याने ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने देखील चंद्र ग्रहणाचे सूतक धरले जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

११ फेब्रुवारी रोजी दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण हे खुल्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. मात्र टेलिस्कोपने ते पाहता येऊ शकेल. चंद्रग्रहणाचा काळ सकाळी ४:०४ वाजता सुरू होईल. तर ११ फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी ८:२३ वाजता संपेल.

नासाच्या माहितीनुसार हिंदुस्थान, युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या अनेक भागांमधून पाहायला मिळेल.

दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी सूर्यग्रहण होणार असून हिंदुस्थानातून मात्र ते पाहाता येणार नाही.