हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज

सामना ऑनलाईन, ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलियाच्या स्वारीवर गेलेला हिंदुस्थानी संघ आज 21 नोव्हेंबरला टी-20 क्रिकेटच्या थराराने दौऱ्याचा शंखनाद करणार आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर सध्या खराब परिस्थितीला सामोरे जात असलेल्या कांगारूंना तीन सामन्यांच्या या मालिकेत नामोहरम करण्यासाठी ‘टीम इंडिया’ सज्ज झाली आहे. याघडीला विराट कोहलीच्या सेनेचे पारडे जड वाटत असले तरी पक्के व्यावसायिक आणि चिवट वृत्तीच्या कांगारूंविरुद्ध ‘टीम इंडिया’ला गाफील राहून चालणार नाही.

‘टीम इंडिया’ने नोव्हेंबर 2017 पासून खेळलेल्या सर्व टी-20 मालिका जिंकलेल्या आहेत. जुलै 2017 मध्ये वेस्ट इंडीजकडून पराभूत झाल्यानंतर हिंदुस्थानने दोन वर्षांत एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही हिंदुस्थानने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन केले होते. यावेळी मागील यशाची पुनरावृत्ती करण्याची ‘टीम इंडिया’ला चांगली संधी आहे.

…तर आम्ही पण त्यांना सोडणार नाही!

virat-kohli‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानावर आम्ही नक्कीच आक्रमक खेळ करू. मात्र स्लेजिंगची सुरुवात आमच्याकडून नक्कीच होणार नाही. प्रतिस्पर्धी संघाने मैदानावर आम्हाला डिवचण्यासाठी स्लेजिंगचा वापर केल्यास आत्मसन्मानासाठी आम्हीही त्यांना सोडणार नाही. संघासाठी सर्वस्व पणाला लावणे, मैदानावर 120 टक्के योगदान देणे हीच आमची आक्रमकतेची व्याख्या होय. मात्र ऑस्ट्रेलियाने मैदानावर अखिलाडू वृत्ती दाखवली तर आम्हालाही नाइलाजाने त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.’ -विराट कोहली (कर्णधार हिंदुस्थान)

विराटच नव्हे, इतर फलंदाजांनाही रोखावे लागेल!

अॅरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) - २९ ऑगस्ट, २०१३ला इंग्लंडविरुद्ध ४७ चेंडूत शतक झळकावले

‘हिंदुस्थानी संघातील कोणत्याही खेळाडूला आम्ही कमी लेखू शकत नाही. किराट हा तर सध्याच्या घडीला जगातील सर्कोत्तम खेळाडू आहे. हिंदुस्थानी संघात स्फोटक आणि तडाखेबाज फलंदाज आहेत. या संघाने भरपूर ‘टी 20’ क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे आम्ही केकळ किराटच नक्हे तर रोहित, शिखर आणि राहुल यांना बाद करण्यासाठीही काही योजनांचा किचार करून ठेकला आहे.’-अॅरोन फिंच (कर्णधार, ऑस्ट्रेलिया)

वॉर्नर , स्मिथवरील बंदी कायम

चेंडू कुरतडल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट या तीन खेळाडूंवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील खेळाडूंच्या संघटनेने त्यांच्यावरील बंदी हिंदुस्थानविरुद्धच्या दौऱ्यापूर्वी उठवावी अशी मागणी केली होती. या तिघांनाही त्यांच्या चुकीबद्दल पुरेशी शिक्षा मिळाली असून आता त्यांच्यावरील बंदी उठवण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूच्या संघटनेने केली होती. मात्र त्यांच्यावरील बंदी कमी करण्यासारखे काहीही घडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली असल्याचे बोर्डाच्या संचालक मंडळाने एकमताने ठरवले आहे. दक्षिण आफ्रिकेकिरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची, तर बॅनक्रॉफ्टकर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

स्मिथ-वॉर्नरच्या गैरहजेरीत दुबळा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मार्चमध्ये झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणातून अद्याप ऑस्ट्रेलियन संघ सावरलेला नाही. कर्णधार स्टिव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर या प्रमुख खेळाडूंसह कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावरील बंदीमुळे विस्कटलेली ऑस्ट्रेलियन संघाची घडी आजपर्यंत बसलेली नाही. स्मिथ-वॉर्नर यांच्यावरील बंदीनंतर ऑस्ट्रेलिया संघाला एकही टी-20 मालिका जिंकता आलेली नाही. याचाच अर्थ या दोन प्रमुख खेळाडूंच्या गैरहजरीत अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ कमजोर झाला आहे.

विराटच्या पुनरागमनामुळे ‘टीम इंडिया’ला धार

मायदेशात झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती, मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाने विंडीजची चांगलीच वाट लावली. आता तर विराट कोहलीचेही संघात पुनरागमन झाल्याने ‘टीम इंडिया’ची धार आणखी वाढली आहे.