बनवा झटपट फिश करी आणि फिश फ्राय

सामना ऑनलाईन | मुंबई

फिश करी 

साहित्य : मासे, १ लहान कांदा, ४-५ पाकळ्या लसूण, १ इंच आल्याचा तुकडा, ३ ते ४ लाल मिरच्या, कोथिंबीर, १ चमचा तिखट चवीप्रमाणे कमी-जास्त, कोथिंबीर, आमसूल, १ ते २ वाटी नारळाचे दूध, १ चमचा गरम मसाला पावडर, १ चमचा हळद, मीठ, फोडणी आणि मासे तळण्यासाठी तेल, कढीपत्ता, हिंग, मासे तळताना कोटिंगसाठी बारीक रवा, कढीपत्ता, हिंग, लिंबू रस

 कृती : सर्वप्रथम माश्यांना तिखट, मिठ, हळद लावून त्यावर लिंबू पिळून बाजूला ठेवा. जरा जाडसर तुकडे कढीसाठी वापरावेत. इतर तुकडे तळण्यासाठी वापरा. आमसूल पाण्यात भिजत ठेवा. आमसूल पाण्यात भिजत ठेवा.

करी मसाला : कांदा/ लसुन/लाल मिरची तव्यावर हलकेसे भाजून घ्या. हे भाजलेले  पदार्थ, कोथिंबीर, आले आणि हळद मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. त्यानंतर  पातेल्यात तेल गरम करून त्यात कढीपत्ता, हिंगाची फोडणी द्या. त्यात वरील मसाला पेस्ट घालून २ मिनिटे परतून घ्या. नंतर गरम मसाला, मीठ, आमसुल टाकून ढवळून घ्या. मग त्यात हवे तितके पाणी टाकून एकजीव करा. (खूप पातळ नको.) एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर त्यात माश्यांची तुकडे टाका. मध्यम आचेवर ५ मिनिटे उकळू द्या . नारळाचे दूध टाका. एक उकळी काढून गॅस बंद करा.

तळण्यासाठी माश्यांना दोन्ही बाजूने रव्याचे कोटींग करून गरम तव्यावर थोड तेल टाकून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्या.