फ्लिपकार्ट जुन्या सामानाला देणार स्वस्ताईचा ‘टू गुड’ टच

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी फ्लिपकार्ट आता जुन्या सामानाला नवे रूप देऊन ते स्वस्तात विकणार आहे. त्यासाठी त्यांनी ‘टू गुड’ ही वेबसाईट तयार केली आहे. या वेबासाईटवर सुरुवातीला जुने इलेक्ट्रिक सामान विकले जाणार आहे. कंपनी त्यासोबत गुणवत्तेचे प्रमाणपत्रही देणार आहे. जुन्या वस्तूंमध्ये मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि टॅबलेट असतील.

तसेच स्पीकर्स, पॉवर बँक, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, टीव्ही सेट आणि या सारखे 400 हून जास्त वस्तू विकणार आहे. या वस्तू 80 टक्के स्वस्त मिळणार आहे. नवीन वेबसाईटला छोटय़ा शहरांकडून अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला आशा आहे.