यूरिन विकून ‘तिने’ कमावले लाखो रुपये!

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा

पैसे कमावण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील एका कॉलेज तरुणीने स्वत:चे यूरिन विकून लाखो रुपये कमावले आहेत. तिने दिलेल्या एका ऑनलाईन जाहिरातीमुळे यूरिनसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. यूरिन विकून ‘ती’ दिवसाला 12 हजार रुपये कमवायची. पैसे कमावण्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे सध्या ‘ती’ चर्चेचा विषय बनली आहे.

फ्लोरिडामधील या तरुणीने एक विचित्र जाहिरात दिली होती. “आपण 3 महिन्यांची गर्भवती असून, ज्यांना माझी पॉझिटिव्ह प्रेग्नेंसी टेस्ट असणारी यूरिन आपल्या ‘खास’ कामासाठी पाहिजे त्यांना मी उपलब्ध करून देऊ शकते. दोन थेंबांच्या विशेष यूरिनसाठी 25 डॉलर आकारले जातील”. ही जाहिरात वाचून तिच्याकडे ग्राहकांची रीघ लागली व तिने त्यातून लाखो रुपये कमावले. पण या युरिन खरेदी मागचे कारण समजल्यावर लोक हैराण झाले.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या महितीनुसार यूरिन खरेदी करणाऱ्या मुली ते युरिन वापरून पॉझिटिव्ह प्रेग्नेंसी टेस्ट दाखवून पुरुषांना ब्लॅकमेल करायच्या. जे पुरुष मुलींशी शारीरिक संबंध ठेऊन लग्न न करता धोका देतात अशांना टेस्ट दाखवून लग्न करायला भाग पाडायच्या. यूरिन विकणाऱ्या तरुणीने मात्र युरिनचा उपयेग विकत घेणारे कशासाठी करतात याबाबत आपल्याला माहित नाही असे म्हटले आहे. यूरिन विकून तिने लाखो रुपये कमवल्याचे मान्य करून यातून मिळालेल्या पैशातून मी माझी कॉलेजची फी भरल्याचे तिने सांगितले.