अन्न हे पूर्णब्रह्म

>>अरविंद दोडे<<

अन्नासाठी दाही दिशा। आम्हा फिरविसी जगदिशा।।

हे कायम लक्षात ठेवून अन्नदेवतेचा मान कसा राखायचा ते पाहूया.

अन्न सेवन करणे हा सर्व सजिवांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, उत्तम आरोग्यासाठी उत्तम अन्नाचा लाभ होणे हे आताशा दुर्मिळ होत चालले आहे. भोजनाचे रितीरिवाज प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत. आपल्या देशातील बहुविध संस्कृती, तर प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. तिच्या सौंदर्यात खाद्य संस्कृतीने वेगळीच भर घातली आहे.

अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानावे. भोजनाला केवळ पोटाची खळगी भरणे समजू नये, तर यज्ञकर्म समजून प्रसन्न मनाने भोजन करावे हे संस्कार आपल्याला सहजपणे केले जातात. ज्याला आधुनिक काळात ‘डायनिंग मॅनर्स’ म्हणतात. ते अनेकांना पुरेसे ठाऊक असतात का? याचा शोध घेतला तर एंशी टक्के लोक हे याबाबतीत अत्यंत बेपर्वा असतात.‘बेपर्वा’ म्हणजे काय, तर आपल्या कष्टाची भाकर खाताना मनोवृत्ती हसरी आणि आनंदी असावी हे ठाऊक असते, परंतु तसे आचरण मात्र अगदी थोडे लोक करतात.

एकत्र कुटुंबपद्धतीत सर्वसाधारण रात्री एकत्र येऊन पुरुषमंडळी भोजन करीत असत. कुटुंबप्रमुखाचा धाक असल्याने जेवताना सहसा वाद झडत नसत. फारसे न बोलता जेवावे, हा साधा नियम बहुधा सर्वजण पाळत. कालांतराने स्वातंत्र्योत्तर काळात आपली जीवनशैली अधिक स्वतंत्र होत गेली.

‘अन्नपूर्णा’ ही अन्नाची देवता. म्हणून हिची आराधना करतात. खाद्यपदार्थादी उपजीविकेच्या वस्तूंवर अधिष्ठत असलेली ही देवता सतत प्रसन्न राहावी म्हणून काय करतात? अन्नाचा आदर करतात. दुर्गामातेचा अवतार म्हणून अन्नपूर्णा ही सुगरण स्त्र्ााrला मान देतात. अन्नावर अवलंबून असणारे प्राण, देह, इंद्रिये यांना अन्नमय म्हणतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत मानवी गरजा. या गरजा भागवताना मरेपर्यंत माणूस कष्ट करतो. अन्नाच्या बाबतीत प्राचीनांनी काही श्रद्धायुक्त विधाने केली आहेत.

‘ऋग्वेदा’त ‘अन्नस्तुती’ नामक एक सुक्त आहे. त्यात अगस्त्यऋषी म्हणतात, ‘हे सोमा! श्रेष्ठ देवांचे मन तुझ्यावर जडले आहे. दूध वा धान्य यांचे जे पदार्थ आम्ही खातो, त्यांचेही हे रसा, तूच पोषक सार हो. तू जीवनरस आणि बुद्धीला उज्ज्वलता देणारा हो…’ याचे सुक्तात पुढे असेही म्हटले आहे की, अन्न हे सुखदायक असते. द्वेषरहित, अद्वितीय मित्र असते. अन्न हे शोभा देते माणसाचे महत्त्व वाढवते. म्हणून अन्नधान्यांनी समृद्ध असलेल्या व्यक्तीला समाजात, मानसन्मान मिळतो. प्रतिष्ठा मिळते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.

‘शिवपुराणा’त अन्नपूर्णेश्वरी कथा आहे, ती अशी ः भगवान शिव हा भिक्षाटन करून आपल्या परिवाराचे भरणपोषण करीत असे. एक दिवस त्याला पुरेशी भिक्षा मिळाली नाही. त्याचा परिवार उपाशी राहिला. तेव्हा देवर्षी नारदमुनी शिवाला भेटले. म्हणाले, ‘‘पार्वतीचा पायगुण वाईट! अशी उपासमार तिच्यामुळे होतेय.’’

नारद लगेच पार्वतीकडे गेले. म्हणाले, ‘‘शिव हा भणंग भूतनाथ! त्यामुळे तुमची उपासमार होतेय.’’

हे ऐकून पार्वतीने शिवाला ‘सोडचिठ्ठी’ देण्याचे ठरविले. त्यावर नारद म्हणाले,

‘‘तू आज शिवाच्या आधी भिक्षेला जा.’’

पार्वतीने तसे केले. तिची झोळी भरून गेली. शिव भिक्षाटनाला गेला. रिकामा परत आला. पार्वतीने त्याला पोटभर भोजन दिले. तो प्रसन्न होऊन म्हणाला, ‘‘तू अन्नपूर्णा म्हणून पुजली जाशील.’’ अर्थात आजही अन्नपूर्णा पूजली जाते.

आपण अन्नपूर्णेचा मान राखतो का? लाखो रुपयांचे घर घेतो, पण जेवताना मात्र क्षुल्लक कारणांवरून भांडतो. घरातली शांती नष्ट करतो… हा अपमान अन्नदेवतेचा, गृहदेवतेचा असतो. जेवताना वादविवाद टाळावेत. मरणाच्या, अपयशाच्या, निराशेच्या गप्पा करून वातावरण बिघडते. गरिबीत काय, श्रीमंतीत काय, शांतपणे भगवंताची कृपादृष्टी म्हणून आपणास आज, आता, याक्षणी अन्नलाभ झाला आहे हे आपले भाग्य असे समजून त्याचे आभार मानावेत.

अन्नावर राग नको

> घरात सर्वजण एकत्र जेवायला बसले की नकळत घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द काढत जातात. भांडणे सुरू होतात. हा अन्नपूर्णेचा अपमान असतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते.

> घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील अडचणी सांगू नयेत. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. काहीही बोलू नका. अन्नाकरून रागाने उठणारा अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.

> अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात.

> मांजरे चोरून दूध पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार? पण एखाद्याचा तोंडचा घास काढून घेतला तर शाप लागतो म्हणतात.

> मतभेद असले तरी समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. शांत मनाने जेकण केले तरच तो आशीर्काद ठरतो क रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो क केळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणकू लागतात.

> अन्न शिजविणारी अथका काढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असणारी कोणतीही व्यक्ती असो, त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात. त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसके असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.