संभाजीनगरमध्ये दूधातून ८१  जणांना विषबाधा

सामना ऑनलाईन। संभाजीनगर

संभाजीनगरमध्ये गायींच्या दूधातून ८१ जणांना विषबाधा झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील धानोरामध्ये ही घटना घडली आहे.

या गावातील २ गायींना दोनच दिवसांपूर्वी पिसाळलेला कुत्रा चावला होता. पण मालकाने गायींवर उपचारच केले नाहीत. यामुळे ते विष गायींच्या दुधात उतरले आणि तेच दूध प्यायल्याने गावातील ८१ जणांना विषबाधा झाली. दरम्यान, याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.