#MumbaiBridgeCollapse Live : सीएसएमटी स्थानकात पूलाचा काही भाग कोसळून पाच ठार, 36 जखमी

25

सामना ऑनलाईन । मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेरील ब्रिजचा काही भाग कोसळला असून त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 34 जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

 • पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार

 • एनडीआरएफने बचाव कार्य थांबवलं

 

 • पुलाचा न कोसळलेला भाग पाडला
 • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक

 • शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी घेतली जखमींची भेट

 • गृहराज्य मंत्री दीपक केसरकर घटनास्थळी. परिस्थितीचा घेतला आढावा
 • मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली

 

 • जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार, पन्नास हजारांची मदत जाही
 • मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले
 • एनडीआरएफचे पथक व श्वान पथक घटनास्थळी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले

 • जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये हेल्पलाईन सुरू…
  Helpline No – 22620242
 • सेंट जॉर्ज रुग्णालयातील जखमी व मृतांची यादी

saint-george-hospital-1

 • जखमींचा आकडा 36 वर, दोघांची प्रकृती गंभीर

 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी केली चर्चा

 • दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, पाच जण ठार

 • दुर्घटनेची चौकशी करू – विनोद तावडे

 • एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल

संध्याकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाची इमारत व सीएसएमटी स्थानकाला जोडणारा हा पादचारी पूल फार जुना पूल आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पूल हलत होता असे समजते. या दुर्घटनेत जाहीद सिराज (32), अपूर्वा प्रभू(35) आणि रंजना तांबे (40) या तिघांसह पाच जणांचा मृत्यू झाला. तर 34 जखमींना सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर मोहम्मद अली रोड कडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या