दहावी पास झाल्याच्या आनंदात पेढे वाटले; चौघांना विषबाधा

71

 

सामना ऑनलाईन,ठाणे

दहावीची परीक्षा भाची चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात दुकानातून पेढे आणले खरे, पण ते पेढे खाऊन चौघांना विषबाधा झाल्याची घटना ठाण्यातील रामचंद्र नगर भागात घडली . चारही जणांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रामचंद्र नगर नं. 2मधील शुभशकून बिल्डिंग येथे राहणारे अमोल कंठे यांनी त्यांची भाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शनिवारी रात्री वैतीवाडी येथील ‘डेअरी ऍण्ड बंगाली स्विट्स’ मधून नातेवाईकांना देण्यासाठी मावा बर्फी विकत घेतली होती. ही बर्फी खाल्यामुळे त्यांच्या घरातील चार जणांना विषबाधा झाली. सोमनाथ बिन्नर (33), मयूर बिन्नर (12), कैलास बेनके (24), गुरुनाथ सदगीर (31) अशी त्यांची नावे असून सर्वांना हरगून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांची तब्येत आता ठीक असल्याचे डॉ. उमेश गौतम यांनी सांगितले. दरम्यान, पेढय़ाचे नमुने ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या