तजेलदार चेहऱयासाठी…

  •  १ चमचा खोबरेल तेलात पाव चमचा हळद मिसळून चेहऱयाला लावल्यास चेहरा तजेलदार राहतो.
  •  चेहऱ्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी २ चमचे लिंबाचा रस आणि २ चमचे दही एकत्र करून तयार केलेला मास्क लावावा.
  •  २ चमचे कोरफडीच्या गरात १ चमचा अंडय़ातील पांढरा भाग एकत्र  करून त्याची पेस्ट करावी. हा मास्क चेहऱयावरील अँण्टीएजिंग सुरकुत्या कमी करतो.
  •  चेहऱयावरील पुरळ दूर करण्यासाठी १ चमचा दालचिनी पावडरमध्ये २ चमचे मध घालावे. एकजीव करून लावावे.
  •  चेहऱयाची त्वचा सैल होऊ नये, सुरकुत्या पडू नयेत, ती घट्ट राहावी याकरिता २चमचे कॉफी पावडरमध्ये  २ चमचे मध घालून तयार केलेला मास्क चेहऱयाला लावावा.
  •  डिप क्लिनसाठी २ चमचे गव्हाच्या पीठात २ चमचे मध घालून तयार केलेले मिश्रण चेहऱयाला लावावे.