रोज दूध प्या!

4

सामना ऑनलाईन । मुंबई

दूध हे परिपूर्ण अन्न मानले जाते. यामधून कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्त्व ‘डी’चा शरीराला मोठय़ा प्रमाणात पुरवठा होतो. आवडीनुसार थंड किंवा गरम दूध पिणे लोक पसंत करतात. पाहूया दूध पिण्याचे काही फायदे

  • दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी असते. यामुळे दात मजबूत होतात. तसचे दात किडणे, दातांवर डाग पडणे असे आजार होत नाहीत.
  • दुधामुळे त्वचा कोमल आणि चमकदार बनते. कारण त्वचेचा पोत सुधारण्यासाठी आवश्यक असलेली पोषकतत्त्वे आणि जीवनसत्त्वे असतात. यासाठी दररोज दूध सेवन करणे गरजेचे आहे.
  • लहान मुलांची हाडे मजबूत होण्यासाठी त्यांना दुधाची गरज असते. तरुणही आपल्या हाडांना बळकटी येण्यासाठी दूध पिऊ शकतात.
  • ज्या महिला रोज दूध पितात त्याचे वजन हे दूध न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत कमी असते. रात्री जेवणानंतर फळे खाल्ल्यावर एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
  • स्नायूंच्या विकासास दूध पूरक ठरते. हा फायदा दुधात असलेल्या प्रोटिनमुळे होतो. बरेच धावपटू व्यायाम केल्यावर दूध पिणे पसंत करतात. यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात आणि त्यांच्या स्नायूंचा विकास जास्त
    होतो. स्नायूंमधील वेदनाही यामुळे दूर होण्यास मदत मिळते.
  • दिवसभर काम केल्यावर जर एक ग्लास दूध पिल्यास स्नायू आणि मस्तकातील सर्व वेदना आणि काळजी कमी व्हायला मदत होते.
  • दूध हे एक सर्वोत्तम ऊर्जेचे भांडार मानले जाते. थकल्यासारखे होत असल्यास एक ग्लास थंड दूध प्या. काही वेळातच ताजेतवाने वाटेल.
  • दूध प्यायल्याने बऱ्याच आजारांना शरीरापासून दूर ठेवता येते. दुधात कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्याची क्षमता असते.
आपली प्रतिक्रिया द्या