नवं वर्ष साजरं करण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकाचा मृत्यू

फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । माधोपूर

राजस्थानमध्ये नवं वर्ष साजरं करण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकाचा मंगळवारी ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या सवाई माधोपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. नेदरलँडचे दोन पर्यटक सवाई माधोपूरमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आले होते. आग्रा येथे जाण्यासाठी या दोन्ही पर्यटकांनी ट्रेन पकडली. मात्र त्यांना ट्रेन सुरू झाल्यानंतर चुकीची ट्रेन पकडल्याच समजलं. त्यामुळे त्यांनी खाली उतरण्याच्या हेतूने ट्रेन सुरू होताच उड्या मारल्या.

ट्रेनचा वेग कमी होता मात्र विदेशी पर्यटकांना उडी मारताना अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली आहे. उडी मारल्याची त्यांची ही छोटीशी चूक एका विदेशी पर्यटकाच्या जीवावर बेतली आहे. तर दुसरा पर्यटक यामध्ये जखमी झाला आहे. दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी एका पर्यटकाला मृत घोषित केलं तर गंभीर जखम झाल्यामुळे दुसऱ्या पर्यटकावर उपचार सुरू आहेत.