ऑगस्टा वेस्टलँड: एस.पी. त्यागी यांना दिलासा, जामीन मंजूर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑगस्टा वेलस्टलँड घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले माजी वायूदल प्रमुख एस.पी. त्यागी यांना दिलासा मिळाला आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला आहे.

एस.पी. त्यागी यांच्यावर तब्बल ३६०० कोटींच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात आरोप ठेवण्यात आले आहेत. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला एकूण ५८० कोटींची लाच दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या लाचखोरी प्रकरणात एसपी त्यागी यांचा हात असल्याचा आरोप सीबीआयकडून लावण्यात येत आहे.

याआधी त्यांच्या १३ नातेवाईकांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. एस.पी. त्यागी सीबीआयच्या रडारवर होते. त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर १० डिसेंबर रोजी त्यांनी अटक करण्यात आली होती.