… म्हणून मी कोहलीचा मोठा चाहता, दिग्गज फिरकीपटूने केली प्रशंसा

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. जागतिक क्रमवारीत नंबर एकवर असणाऱ्या कोहलीची फलंदाजी पाहताना काळही थांबावा असेही वाटते. कोहली जेवढा मैदानावर आक्रमक आहे तेवढाच बोलताना नम्र. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न देखील कोहलीच्या या नम्रपणावर फिदा आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना वॉर्नने याबाबत सांगितले.

शेन वॉर्नने कोहलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कोलहीचा खेळण्याचा अंदाज मला खूप भावतो. तसेच मला तो जे बोलते ते देखील आवडते. तो कधीही पराभव मान्य करत नाही. तुम्हाला माहिती आहे, कोहलीला जे वाटते ते तो प्रामाणिकपणे बोलतो. त्याला जे योग्य वाटते ते तो बोलतो आणि तो खरा माणूस आहे. कोहली थोडा भावूकही आहे आणि कधी-कधी इमोशनल होतो, पण ही त्याची खासियत असल्याचेही वॉर्न म्हणाला.

आगामी आयपीएल स्पर्धेत शेन वॉर्न राजस्थान रॉयल्स संघाचा ब्रँड अँबेसेडर आहे. कोहलीबाबत वॉर्न पुढे म्हणतो, क्रिकेटमधील सर्वच लोक त्याच्यावर प्रेम करतात. कारण तो नेहमची ताजातवाना असतो. म्हणून त्याच्या नावावर एवढी शतकं आहेत. तसेच मी त्याची कोणासोबत तुलना करणार नाही, ज्यावेळी तो निवृत्त होईल तेव्हा मात्र मी त्याच्या कारकीर्दीची तुलना करेल, असेही वॉर्न म्हणाला.