बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या जिवाला धोका

59

सामना प्रतिनिधी । ढाका

भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात असलेल्या बांगलादेश नॅशनल पक्षाच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या जिवाला धोका असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांत त्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली आहे.

पक्षाचे नेते जमरुद्दीन सरकार यांनी सरकारवर गंभीर टीका केली आहे. झिया यांना 200 वर्षे जुन्या तुरुंगात डांबण्यात आले आहे. या तुरुंगात कोणत्याही वैद्यकीय उपचारांची सोयीसुविधा नाही. त्यांना उच्च रक्तदाबासह हृदयविकाराचा त्रास आहे, मात्र त्यांच्यावर योग्य ते उपचार होत नसल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका आहे. जीवन आणि मृत्यूशी त्यांचा संघर्ष सुरू आहे, मात्र सरकार त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असे सरकार यांचे म्हणणे आहे. दरम्यान, न्यायालयात हजर राहू नये यासाठी झिया वेगवेगळय़ा आजारांचा बनाव करत असल्याचा आरोप बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या